
महाराष्ट्राच्या अथर्व मडकरने सर्वाधिक 7.5 गुणांची कमाई करीत यू इन स्पोटर्स आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मानांकन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. श्रीराज भोसले व शाश्वत गुप्ता या खेळाडूंनी प्रत्येकी 7 गुणांसह अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
अखिल हिंदुस्थानी बुद्धिबळ महासंघ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्पल यांच्या मान्यतेने ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार मोहनराव देशमुख यांच्या हस्ते पार पडला.
अंतिम क्रमवारी – अथर्व मडकर (महाराष्ट्र) – 7.5 गुण, श्रीराज भोसले (महाराष्ट्र)- 7 गुण, शाश्वत गुप्ता (महाराष्ट्र) – 7 गुण, आदित्य सावळकर (महाराष्ट्र)- 7 गुण, प्रथमेश शेरला (महाराष्ट्र)- 7 गुण, राहुल संगमा (गुजरात – पेट्रोलियम बोर्ड)- 6.5 गुण, दिव्या पाटील (महाराष्ट्र) – 6.5 गुण, अमर्त्य गुप्ता (दिल्ली) – 6.5 गुण, ऋषिकेश कबनुरकर (महाराष्ट्र)- 6 गुण, नीलय पुलकर्णी (महाराष्ट्र)- 6 गुण.