
राज्यामध्ये सध्याच्या घडीला महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. यात सांस्कृतिक राजधानीचे शहर पुणेही मागे नाही. पुण्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. स्वारगेट बस स्थानकात तरूणीवर झालेल्या, अत्याचाराच्या घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पुणे हादरले आहे.
कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या 25 वर्षांच्या तरूणीवर एका कुरिअर बॉयने बलात्कार केल्याचे दुष्कृत्य समोर आले आहे. तरूणीवर अत्याचार करून तिला मी पुन्हा येईन अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास ही भयंकर घटना घडली. कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीच्या घरी कुरिअर बॉय आला. सोसायटीमध्ये शिरण्यासाठी त्याने मी कुरिअर बॉय असून डिलीव्हरी देण्याकरता आलो असून, बँकेकडून काही कागदपत्रे द्यायची आहेत असे त्याने सांगितले.
सोसायटीच्या वॉचमेनला चकवा देऊन तो तरुणीच्या घरी गेला आणि तुमचं करिअर आलंय असं त्याने तरुणीला सांगितले. पण हे माझं पार्सल नाही असं त्या तरूणीने त्याला सांगितले. यावर कुरिअर बॉयने तिला दमात घेऊन, हे तुमचं पार्सल नसलं तरीही तुम्हाला सही करावी लागेल असं त्या तरूणीला सांगितलं. त्याचं म्हणणं एकून तरुणीने घराचा सेफ्टी डोअर उघडला आणि यायाच फायदा घेऊन कुरिअर बॉयने तिच्या तोंडावर स्प्रे मारला. यानंतर तो तिच्या घरात शिरला आणि त्या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडित तरूणीचा मोबाईल घेऊन त्याने एक सेफ्ली काढला. एवढेच नाही तर त्याने तिच्या मोबईलमध्ये मी पुन्हा येईन असा मॅसेजही टाईप करून ठेवला आणि घटनास्थळावरून पळ काढला.
घडलेल्या भयंकर घटनेनंतर तरूणीने न घाबरता पोलिसात धाव घेतली. कोंढवा पोलीस स्टेशनला जाऊन संपूर्ण प्रसंग सांगितला. दरम्यान आता पोलिसांनी पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीवरून, कुरिअर बाॅयवर गुन्हा दाखल करुन त्याचा आता तपास सुरु आहे.