बावनकुळे काटेचे गॉडफादर, प्रवीण गायकवाड यांचा आरोप

माझ्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. या हल्ल्याच्या कटाची रेकी चार दिवसांपासून सुरू होती. हल्लेखोर स्वागतासाठी आलेल्या लोकांमध्ये लपले होते. दीपक काटे हा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना गॉडफादर मानत आहे. त्यामुळे या हल्ल्याचे मास्टरमाइंड बावनकुळेच आहेत. सरकारने गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा; अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज दिला.

फडणवीस खोटं बोलले

हा हल्ला सरकारपुरस्कृत होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या हल्ल्याबाबत विधिमंडळाला खोटी माहिती दिली होती, असा आरोप गायकवाड यांनी केला.