ठाणे पोलीस मुख्यालयातील 15 पोलीस तडकाफडकी निलंबित, ठाण्यात दोन तर भिवंडीतील एक कैदी फरार

कारागृहातून कैद्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर सातपैकी दोन कैदी फरार झाल्या प्रकरणी ठाणे पोलीस मुख्यालयातील नऊ पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर भिवंडीतील एका कैद्याला न्यायालयात हजर केले असता गर्दीचा फायदा घेऊन तो पळून गेल्याने सहा पोलिसांवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ही कारवाई केली. ठाणे पोलीस मुख्यालयातील पंधरा पोलिसांना निलंबित करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यात एका महिला पोलिसाचाही समावेश आहे.

ठाणे मध्यवर्ती कारागृह येथून एकूण 7 कैद्यांना ताब्यात घेऊन कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला उपचारासाठी नेण्यात आले. या वेळी नऊ पोलीस कॉन्स्टेबलना कैदी पार्टी डय़ुटीवर नेमण्यात आले होते. या कैदी पार्टीसाठी पोलीस हवालदार गंगाराम घुले यांच्यावर पार्टी इंचार्ज म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. कळवा रुग्णालयातून कैद्यांना पुन्हा करागृहात नेले. या वेळी कैद्यांची मोजणी केली असता पोलिसांच्या ताब्यातील 7 कैद्यांपैकी केवळ 5 कैदी आढळले. 2 कैदी फरार असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी गंगाराम घुले, गिरीश पाटील, विलास मोहिते, किशोर शिर्के, अशोक मुंडे, संदीप खरात, सुनील निकाळजे, भरत जायभायेसह विक्रम जंबुरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

दुसऱया घटनेत भिवंडी पोलिसांच्या कस्टडीत पोक्सो कायद्याखाली अटक करण्यात आलेला सलामत अली अन्सारी या कैद्याला ठाणे तुरुंगात हजर करण्यासाठी नेण्यात आले. परंतु गर्दीचा फायदा घेऊन त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिली आणि तो फरार झाला. याप्रकरणी कैदी पार्टीतील पोलीस हवालदार अमोल तरटे, मोतीराम ढेंबरे, दत्ता सरकटे, दीपक इंगळे, विकास चाटे यांच्यासह पोलीस महिला हवालदार संगीता चौखंडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

मुख्यालय सोडल्यास शिस्तभंगाची कारवाई

निलंबन कालावधीमध्ये या सर्व पोलिसांना पोलीस मुख्यालयात दररोज न चुकता हजेरी द्यावी लागणार आहे. तसेच त्यांना पोलीस उपायुक्त यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. पुर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडल्यास त्यांचेविरुध्द अन्य शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.असे कारवाई आदेशात म्हटले आहे.

ठाणे मध्यवर्ती कारागृह येथून एकूण 7 कैद्यांना ताब्यात घेऊन कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला उपचारासाठी नेण्यात आले. या वेळी नऊ पोलीस कॉन्स्टेबलना कैदी पार्टी डय़ुटीवर नेमण्यात आले होते. या कैदी पार्टीसाठी पोलीस हवालदार गंगाराम घुले यांच्यावर पार्टी इंचार्ज म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. कळवा रुग्णालयातून कैद्यांना पुन्हा करागृहात नेले. या वेळी कैद्यांची मोजणी केली असता पोलिसांच्या ताब्यातील 7 कैद्यांपैकी केवळ 5 कैदी आढळले. 2 कैदी फरार असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी गंगाराम घुले, गिरीश पाटील, विलास मोहिते, किशोर शिर्के, अशोक मुंडे, संदीप खरात, सुनील निकाळजे, भरत जायभायेसह विक्रम जंबुरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

दुसऱ्या घटनेत भिवंडी पोलिसांच्या कस्टडीत पोक्सो कायद्याखाली अटक करण्यात आलेला सलामत अली अन्सारी या कैद्याला ठाणे तुरुंगात हजर करण्यासाठी नेण्यात आले. परंतु गर्दीचा फायदा घेऊन त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिली आणि तो फरार झाला. याप्रकरणी कैदी पार्टीतील पोलीस हवालदार अमोल तरटे, मोतीराम ढेंबरे, दत्ता सरकटे, दीपक इंगळे, विकास चाटे यांच्यासह पोलीस महिला हवालदार संगीता चौखंडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

वरिष्ठांची दिशाभूल केली असल्याचा ठपका

कैदी पार्टीमधील सर्व पोलीस अंमलदारांनी त्यांचा कोणता तरी हेतू साध्य करण्यासाठी एकमेकांशी संगनमत करून वरिष्ठांची दिशाभूल केली असल्याचा ठपकाही निलंबनाची कारवाई करताना ठेवण्यात आला आहे.