
मैत्री म्हणजे दोन व्यक्तींमधील अढळ प्रेम… मात्र दोघांच्या या निखळ मैत्रीत कुणा तिसऱ्याची एन्ट्री झाली तर मैत्रीत वैर येते. आणि यातून अघटीत घटना घडतात. अशीच एक घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या बालपणीच्या मित्राची निघ्रृण हत्या केली आहे. या घटनेमागचे कारणही तितकेच भयंकर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विजय कुमार आणि आरोपी धनंजय उर्फ जय अशी या दोन मित्रांची नावे आहेत. विजय कुमार आणि धनंजय हे तीन दशकांहून अधिक काळ मित्र होते. सुनकडकट्टे परिसरात राहायला जाण्यापूर्वी ते बेंगळुरूच्या मगडीमध्ये एकत्र वाढले. रिअल इस्टेट आणि फायनान्समध्ये काम करमाऱ्या विजयने दहा वर्षांपूर्वी आशा नावाच्या महिलेशी लग्न केले होते. यानंतर आशा आणि विजय हे दोघे कामाक्षीपाल्यात राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय आणि आशाचा 10 वर्षांचा सुखी संसार असताना आशाचे विजयच्या मित्रासोबत प्रेमसंबंध होते. विजयला अलीकडेच याबाबत समजले होते. विजयने त्या दोघांनाही एकत्र पाहिले देखील होते. इतकेच नाही तर दोघांचे एकत्र फोटोही सापडले होते. त्यानंतर विजय आणि आशा या नवरा बायकोमध्ये भांडण झाले. खूप वादावादी झाल्यानंतर लग्न वाचवण्याच्या प्रयत्नात विजय त्याच्या पत्नीसोबत कडबागेरेजवळील माचोहल्ली येथे भाड्याच्या घरात राहायला गेला. विजय पत्नीला घेऊन धनंजयपासून दूर गेला होता मात्र करीही यांचे प्रेमसंबंध सुरूच राहिले.
30 वर्षांची मैत्री असलेल्या मित्रानेच घात केल्याचा राग विजयच्या मनात होता. दरम्यान घटनेच्या दिवशी, विजय संध्याकाळपर्यंत घरीच होता. नंतर तो माचोहल्लीच्या डीग्रुप लेआउट परिसरात मृतावस्थेत आढळला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरु केला. दरम्यान आशा आणि धनंजय यांच्यातील प्रेमसंबंधातून विजयची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सध्या मदनायकनहल्ली पोलिसांनी आशाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे आणि बेपत्ता असलेल्या धनंजयचा शोध घेत आहेत.