
बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी आज या जगात नसली तरी तिच्या आठवणी नेहमीच ताज्या राहतील. आज (13 आॅगस्ट) श्रीदेवीच्या जयंती निमित्त पती बोनी कपूर यांनी श्रीदेवीसाठी दोन पोस्ट पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी श्रीदेवीचे मनापासून आभार मानले आहेत. इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर करत त्यांनी श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
View this post on Instagram
बोनी कपूर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले – हो, तू आता 62 वर्षांची नाही तर, 26 वर्षांची झाली आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्ही अजूनही तुझ्या सर्व आठवणी जपत आहोत असे म्हणत त्यांनी इंग्लिश-विंग्लिश चित्रपटातील श्रीदेवीचा एक फोटो शेअर केला आहे.
दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले – 1990 मध्ये चेन्नईमध्ये श्रीदेवीचा वाढदिवस होता. तेव्हा मी तिला तिच्या 26 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या पोस्टसह त्यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे. यामध्ये बोनी कपूर हसत आहेत आणि श्रीदेवी त्याच्याकडे बोट दाखवून काहीतरी बोलत आहेत.
View this post on Instagram
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांचे लग्न 1996 मध्ये झाले. त्यांचे लग्न गुप्त होते. बोनी आणि श्रीदेवी यांनी ते जाहीरही केले नव्हते. लग्न अनेक महिने गुप्त ठेवल्यानंतर, बोनी आणि श्रीदेवी यांनी जानेवारी 1997 मध्ये लग्न जाहीर केले. बोनी आणि श्रीदेवीची प्रेमकथा खूपच फिल्मी होती.