मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

हवामान खात्याच्या अतिमुसळधार पावसाचा इशाऱया मुळे गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या 19 ऑगस्ट रोजीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारीत वेळापत्रकानुसार आता या परीक्षा 23 ऑगस्ट 2025 रोजी नियोजित वेळेनुसार होणार आहेत.

आज आयोजित असलेल्या परीक्षांमध्ये मास्टर ऑफ आर्ट कम्युनिकेशन जर्नेलिझम सत्र 3, पीआर सत्र 3, टेलेव्हिजन स्टडीज सत्र 3, इलेक्ट्रॉनिक मीडिया सत्र 3, फिल्म स्टडीज सत्र 3, एमपीएड सत्र 2, बीपीएड सत्र 2, बीफार्म सत्र 2, एमफार्म सत्र 2, एमएड सत्र 2, एमकॉम (ईकॉमर्स) सत्र 4, एमए (सीडीओई), बीई ( कम्प्युटर सायन्स अँड डिजाईन, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स) यासह अन्य परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षांना बसणाऱया सर्व संबंधित विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी सुधारीत वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.