लष्कराला बळकटी, आयएडीडब्ल्यूएसच्या पहिल्या उड्डाणाची यशस्वी चाचणी

हिंदुस्थानच्या लष्करी सामर्थ्याला बळकटी मिळाली असून डीआरडीओने आयएडीडब्ल्यूएस म्हणजेच एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीच्या पहिल्या उड्डाणाची यशस्वी चाचणी घेतली. ओदिशाच्या किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आली. ही एक अत्याधुनिक बहुस्तरीय प्रणाली असून त्यात अनेक स्वदेशी क्षेपणास्त्रs तसेच  शक्तिशाली लेसर शस्त्रांचा समावेश आहे.

आयएडीडब्ल्यूएस प्रणाली शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत सक्षम असून त्यामउळे हिंदुस्थानची हवाई संरक्षण क्षमता लक्षणीयरित्या वाढणार आहे. दरम्यान, या यशस्वी चाचणीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि हिंदुस्थानी सशस्त्र दलाचे अभिनंदन केले.

आयएडीडब्ल्यूएसमध्ये क्विक रिऍक्श सरफेस टू एअर मिसाई, ऍडव्हान्स व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम मिसाईल आणि डायरेक्टेड एनर्जी वेपन यांचा समावेश आहे. डायरेक्टेड एनर्जी वेपन हे हवेत शत्रूची विमाने आणि क्षेपणास्त्रs नष्ट करण्यासाठी सक्षम आहे