
पूर्वी सणाची चाहूल लागायची ती बाजारात फिरल्यावर… तिथली लगबग बघितल्यावर… नातेवाईकांशी, मित्रमंडळींशी होणाऱ्या चर्चेतून. आता काळ बदललाय. हल्ली नव्या सणाची चाहूल लागते ती सोशल मीडियातून. तिथं येणाऱ्या नवनव्या ट्रेंडमधून. महाराष्ट्राचा महाउत्सव त्यास अपवाद कसा असेल? गणेशोत्सव सुरू होण्याआधीच त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या रिल्सचा ट्रेंड आला आहे. खासकरून गणरायाशी संबंधित गाण्यांचा. ‘चिक मोत्याची माळ…’ हे अनेकांचं आवडतं गाणं. या गाण्यावर शिक्षिकेनं तिच्या विद्यार्थिनींसोबत केलेला डान्स सध्या व्हायरल होतोय. चिमुकल्या विद्यार्थिनीही शिक्षिकेचं अनुकरण करत प्रत्येक स्टेप अचूक करताना दिसतायत. @arpita_lucky या अकाऊंटवर हा व्हिडिओ पाहता येईल.