गणपती बाप्पा मोरया 2025- बाप्पाच्या नैवेद्यासाठी साधे सोपे न फुटणारे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक

गणपती बाप्पाचे आगमन होण्यासाठी अवघे काही तास राहिले आहेत. एव्हाना बाप्पाच्या सजावटीसाठी मखर, आरास अशी सर्व तयारी इत्यंभूत झाली असेल. बाप्पाच्या स्वागतासाठी लहान थोरांसह सर्वजण सज्ज झाले असतील. या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाप्पाला दाखवण्यात येणारा मोदकांचा नैवेद्य. मोदकांचा नैवेद्य हा प्रत्येक प्रांतानुसार बदलतो. खासकरुन कोकण पट्ट्यात बाप्पाला तांदळाच्या उकडीचे नैवेद्य दाखवला जातो. घाटमाथ्यावर गव्हाचे तळणीचे किंवा उकडीचे मोदक केले जातात.

उकडीचे मोदक (फाटणार नाहीत अशी पद्धत)
साहित्य:
सारणासाठी:
किसलेला नारळ – २ कप
गूळ – १.५ कप (किसलेला)
वेलची पूड – १/२ टीस्पून
जायफळ पूड – १/४ टीस्पून (ऐच्छिक)
तूप – १ टीस्पून

गणपती बाप्पा मोरया 2025 – झटपट होणारे शाही मोदक करा घरच्या घरी, वाचा

उकडीसाठी:
तांदळाचं पीठ – २ कप
पाणी – २.५ कप
मीठ – १/४ टीस्पून
तूप – १ टीस्पून

गणपती बाप्पा मोरया 2025- मऊ लुसलुशीत मोदक करण्यासाठी कोणता तांदूळ सर्वात उत्तम, वाचा

कृती:

सारण तयार करण्यासाठी – सर्वात आधी कढईत तूप गरम करुन घ्यावे. तूप करपवू नये, हलके गरम करुन घ्यावे. त्यात किसलेला नारळ घालून २ मिनिटे परतवावे. गूळ घालून मंद आचेवर वितळू द्यावा. गूळ पूर्ण विरघळल्यानंतर त्यात वेलची आणि जायफळ पूड घालावी. मिश्रण जास्त कोरडं किंवा पातळ होऊ नये, मध्यमसर असलं पाहिजे.

तांदळाची उकड कशी तयार करावी?
पातेल्यात पाणी, मीठ आणि तूप उकळवून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ घालावे आणि पटकन ढवळून घ्यावे. गॅस बंद करून झाकण लावून ठेवून द्यावे. ५ मिनिटं झाकून ठेवावे म्हणजे पीठ मऊ होईल. गरमसर असतानाच (हाताला पाणी लावून) पीठ मळून घ्यावे. जितके जास्त मळले जाईल तितके मोदक मऊ लुसलुशीत होतील.

त्यानंतर पीठाचा लहान गोळा हातावर घेऊन, त्याला पुरीचा आकार द्या. यामध्ये मधोमध सारण भरून हळूच कडांना घडी देऊन वर बंद करा.

मोदक वाफवण्याची योग्य पद्धत

मोदकांवर हलके पाणी शिंपडावे आणि वाफवण्याच्या भांड्यात ठेवावे. मध्यम आचेवर १०-१२ मिनिटं वाफवून घ्यावेत.