ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये रंगला खेळ मंगळागौरीचा

घागर घुमू दे घुमू दे.. रामा पावा वाजू दे, गौराई आली माझी गौराई आली, पिंगा गं पोरी पिंगा अशा विविध गाण्यांच्या तालावर आज महिलांची पावले थिरकली. निमित्त होते शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या महामंगळागौरीचे. रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गडकरी रंगायतनमध्ये मंगळागौरीचे खेळ रंगले. फुगडी, कोंबडा, पिंगा, झिम्मा या पारंपरिक खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या पुढाकाराने या महामंगळागौर सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, उपनेत्या ज्योती ठाकरे, संपर्कप्रमुख नरेश मणेरा, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, एम.के. मढवी, संजय तरे, अनिश गाढवे, संपर्कप्रमुख रंजना नेवाळकर, जिल्हा संघटक रेखा खोपकर, रंजना शिंत्रे, नीलम धवन, वैशाली दरेकर, उपजिल्हा संघटिका आकांक्षा राणे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे, ज्योती कोळी, ठाणे विधानसभा संघटिका प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, विद्या कदम, माजी महापौर स्मिता इंदुलकर, अनिता प्रभू, कळवा-मुंब्रा विधानसभा संघटिका पुष्पालता भानुशाली, कल्याण ग्रामीण विभाग संघटिका योगीता नाईक, माजी नगरसेविका नीलिमा शिंदे, स्नेहल सावंत, ज्योती पाटील, अंकिता पाटील यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.

रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

मंगळागौरीच्या कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. विजेत्या सारिका जाधव, प्रिया भोई, रशिदा अन्सारी, सायली बहाटे, पूजा हरजकर, स्मिता ढमामे, सुषमा मानकर आदींना साडय़ा देण्यात आल्या. या कार्यक्रमात भाजपच्या पदाधिकारी सुष्मिता भोसले यांनी शिवसेनेत प्रवेश केला.