मोईत्रा यांनी अमित शहांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. ‘अमित शहा यांचे शीर धडावेगळे करून प्रदर्शनासाठी ठेवायला हवे, अशी टीका मोईत्रा यांनी केली होती. त्यावरून भाजप व तृणमूल काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे.

बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्दय़ावरून सरकारवर टीका करताना त्या बोलत होत्या. ‘देशाच्या सीमांचे संरक्षण होत नसेल, शेकडोंच्या संख्येने बांगलादेशी घुसखोर येत असतील, महिलांचा अपमान करत असतील, आपल्या जमिनी हिसकावत असतील तर हे कोणाचे अपयश आहे, असा सवाल मोईत्रा यांनी केला.