
1 हजार 800 हून अधिक चित्रपट कलाकारांनी इस्रायली चित्रपट इंडस्ट्रीजवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायली फिल्म इंडस्ट्री गाझात पॅलेस्टिनीविरोधात होत असलेल्या अत्याचारात सहभागी आहे, असा त्यांचा आरोप आहे. यासंबंधी एक पत्र लिहिले असून या पत्रावर ब्रिटिश कलाकार ओलिविया कोलमैन यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.