
पुष्पांजली कॉ. क्रेडिट सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक 2025 ते 2030 या कालावधीसाठी संपन्न झाली. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली पुष्पांजली पॅनलचा पुष्पांजली सहकार पॅनेलने दारुण पराभव केला. भुलेश्वर, दादर, कल्याण, नवी मुंबई, आळंदी, भोसरी, चाकण व जुन्नर या आठ ठिकाणी निवडणूक आयोगातर्फे ही निवडणूक घेण्यात आली होती. संत ज्ञानेश्वर माऊली पुष्पांजली पॅनेलचे नेतृत्व दिनेश ज्ञानेश्वर पुंडे यांनी, तर पुष्पांजली सहकार पॅनेलचे नेतृत्व निखिल नारायण भोईटे यांनी केले. दादाभाऊ येणारे, जगदीश दुराफे, गणेश झगडे, अॅड. अशोक लोखंडे, राजेंद्र पवार, सार्थक मनोज पुंडे, आबासाहेब मुंडे, शैला गोडसे, अश्विनी लोणारी हे पुष्पांजली सहकार पॅनेलचे अकरा उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले.