
गुजरात हायकोर्टाला सोमवारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीने गुजरात हायकोर्टाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर हा धमकीचा मेल पाठवण्यात आला होता. या वर्षी जूननंतर गुजरात हायकोर्टाला मिळालेली ही तिसरी धमकी आहे. याआधी 12 सप्टेंबरला दिल्ली आणि मुंबई हायकोर्टाला धमकी मिळाली होती. गुजरात हायकोर्टाला धमकी मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलीस, डॉग स्कॉड पोहोचले. या ठिकाणच्या सर्व इमारती, चेंबर, गाड्यांसह सर्व परिसराची कसून तपासणी केली, परंतु या ठिकाणी कोणतीही संशयित वस्तू आढळली नाही.