
जगात सर्वात स्वस्त सोने दुबईत मिळते अशी आपली समज आहे. पण दुबईपेक्षा स्वस्त सोने इतर देशांमध्ये आहे, हे सध्याच्या दरांवरून दिसतंय. अमेरिकेत सोने सध्या जास्त स्वस्त आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका देश हा सोने खरेदीसाठी परवडणारा देश ठरला आहे. अमेरिकेत 24 कॅरेट सोने 8586 रुपये प्रति ग्रॅम दराने तर 22 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 7874 रुपये दराने विकले जाते. त्याखालोखाल ऑस्ट्रेलिया हा देश आहे. ऑस्ट्रेलियात 24 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 8602 रुपये तर 22 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 7889 रुपये आहे. आशियातील सिंगापूर येथेही सोने स्वस्त आहे. सिंगापूरमध्ये 8667 रुपये प्रति ग्रॅम व 7949 रुपये प्रति ग्रॅम दराने विकले जात आहे. त्याखालोखाल स्वित्झलँड, इंडोनेशिया यांचा समावेश आहे.