
मुंबईतील मालाड परिसरात धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून मित्रानेच मित्रावर गोळीबार केला. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुरार गावमधील संजय नगरमध्ये शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित दोघेही मित्र आहेत. शनिवारी मध्यरात्री प्राॉपर्टीवरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद टोकाला गेला आणि एका मित्राने दुसऱ्यावर गोळी झाडली. यात पीडित गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.