अमेरिकेनंतर फ्रान्समध्ये शटडाऊनचे सावट! नोकरकपात, खर्चकपातीविरोधात निदर्शने; आयफेल टॉवरही बंद

अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्ये शटडाऊनचे सावट घोंघावत आहे. नोकरकपात, खर्चकपातीविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत. फ्रान्सच्या अनेक भागांमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आयफेल टॉवरलाही फटका बसला असून पर्यटकांसाठी आयफेल टॉवर बंद करण्यात आला आहे. तसे पोस्टरच आयफेल टॉवर बाहेर लावण्यात आले आहे.

फ्रान्समधील 200 शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत. हजारो कामगार, निवृत्त कर्मचारी आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पॅरीसमध्येही ‘प्लेस दी इटली’ पासून मोर्चाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आयफेल टॉवर बंद करावा लागला.

अमेरिकेवर शटडाऊनचे संकट, सरकारी कामकाज ठप्प होणार; कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांचीही कोंडी होणार