
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो हल्ल्याचा प्रयत्न झाला, अशा घटना देशात का घडत आहेत? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच मोदी, शहा यांनी गेल्या 10 वर्षात न्यायव्यवस्थेचे जे धिंडवडे काढले आहे, हे त्याचेच स्वरुप असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला. तसेच या घटनेबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो हल्ल्याचा प्रयत्न झाला, त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांरून निषेध केला.पंतप्रधानांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचेही समजले आहे. मात्र, अशा प्रकारच्या घटना देशात का घडत आहेत? गेल्या 10 वर्षात देशात धर्मांधतेचे, अंधभक्तीचे विष पसरवण्यात आले आहे, त्यातून असे माथेफिरु निर्माण झाले. देशाच्या न्यायव्यवस्थेबाबत आदर बाळागावा, असे वातावरण सध्या नाही. न्यायव्यवस्थेला जोडे मारावे, अशी परिस्थिती आहे. मात्र, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत आणि त्यांच्या कार्याबाबत देशाला आदर आहे. न्यायव्यवस्थेत त्यांच्यारुपाने आशेचा किरण दिसत आहे. अन्यथा गेल्या 10 वर्षात मोदी आणि शहा यांनी न्यायव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. त्यामुळे भूषण गवई यांच्यावर हल्ला करणारे भाजपच्या ट्रेनिंग स्कूलमधले सनातनी म्हणवून घेणारे सदस्य आहेत, असे त्यांनी सांगितले.
विष्णूचा अवतार नक्की कोण? मोदी स्वतःला विष्णूचे 13 वे अवतार म्हणवून घेतात. सरन्यायाधीशांनी भगवान विष्णूबाबत टिप्पणी केली होती. विष्णूची प्रार्थना करा, आराधना करा, असे ते म्हणाले. काही लोकांनी वाटले ते विष्णुच्या 13 व्या अवताराबाबत बोलत आहेत, त्यामुळे त्यांना राग आला का? असे बिनडोक, मठ्ठ आणि हिंदुत्वाला कंलक लावणारे लोकं आहेत. हे खरे हिंदू नाही, ते बेगडी हिंदुत्ववादी आहेत. ज्यांनी सनातनच्या नावाखाली हल्ला केला, त्यांनी देशाच्या संविधानावर हल्ला केला. देशाच्या आत्म्यावर हल्ला केला. ज्यांच्याबाबत देशाच्या जनतेच्या मनात आदर आहे अशा सरन्यायाधीशपदी असलेल्या व्यक्तीवर हल्ला करण्यात आला आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेचे भाजपने काढलेल्या धिंडवड्याचे हे स्वरुप आहे. मारेकरी, हल्लेखोर यांनी कधीही पश्चात्ताप होत नाही. अंधभक्त वेगळ्याच धुंदीत असतात, असे ते म्हणाले.