
IndiGo Airlines ला ‘कॅटेगरी सी’ (Category C) विमानतळांवर वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी ‘योग्य सिम्युलेटर’न वापरल्याबद्दल 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती एअरलाइनची मूळ कंपनी InterGlobe Aviation ने बुधवारी सांगितले.
एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, InterGlobe ने सांगितले की कंपनी या दंडाच्या आदेशाला आव्हान देईल. तसेच, यामुळे एअरलाइनच्या कामकाजावर कोणताही मोठा परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कंपनीने असेही म्हटले आहे की, DGCA ने 26 सप्टेंबर रोजीच हा आदेश दिला होता.