अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्या! बळीराजासाठी शिवसेनेचे आंदोलन, ठाणे, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी करत बुधवारी शिवसेना नेते राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी उपनेते गुरुनाथ खोत, विजय साळवी, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, प्रकाश पाटील, कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, अल्पेश भोईर, संपर्कप्रमुख नरेश मणेरा, एम. के. मढवी, दिवा संपर्कप्रमुख रोहिदास मुंडे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, रंजना शिंत्रे, कळवा-मुंब्रा विधानसभा शहर संघटक पुष्पलता भानुशाली, कळवा समन्वयक नीलिमा शिंदे, ठाणे उपजिल्हाप्रमुख कृष्णकांत कोळी, सुनील पाटील, कल्याण उपजिल्हाप्रमुख विजय देसाई, प्रदीप शिंदे, समन्वयक संजय तरे, ठाणे शहरप्रमुख अनिश गाढवे, दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, मुंब्रा शहरप्रमुख विजय कदम, ठाणे उपशहरप्रमुख सचिन चव्हाण, वसंत गव्हाळे, परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, विधानसभा संघटक चंद्रकांत विधाते, प्रमिला भांगे, आकांक्षा राणे, मंदार विचारे आदी उपस्थित होते.

एक मंत्री स्वतःला शेतकरी म्हणवतो आणि ठाण्यातून कल्याणला जायचे असेल तरी हेलिकॉप्टरमधून फिरतो. त्या मंत्र्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आर्थिक मदत द्यावी. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे.

राजन विचारे, शिवसेना नेते, माजी खासदार