
कल्याण, अंबरनाथमधील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.
पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकाऱयांमध्ये कल्पेश देसाई, भाजपचे वांगणी येथील उपजिल्हाध्यक्ष प्रमोद खंडागळे, अजित पवार गटाचे शाखाध्यक्ष सूरज सोनावणे, शिंदे गटाचे शाखाप्रमुख हर्ष लब्दे तसेच शहाड बंदरपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेट्टी यांचा समवेश आहे. यावेळी शिवसेना उपनेते विजय साळवी, भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे, कल्याण जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, कल्याण शहरप्रमुख बाळा परब, उपशहरप्रमुख राजू दीक्षित, शहर संघटक मीनल कांबळी, राजलक्ष्मी अंगारखे, प्रवीण काबाडी, प्रथमेश पुण्यार्थी, रेखा पंटे आदी उपस्थित होते.
घोडदौड अभेद्य राहील!
आगामी सर्व निवडणुकांमध्ये कल्याणमधील विरोधकांना चितपट करू आणि शिवसेनेची घोडदौड अभेद्य ठेवू, अशी ग्वाही यावेळी उपनेते विजय साळवी यांनी दिली.
रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष आशुतोष निकाळजे शिवसेनेत
जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष आशुतोष निकाळजे, एल्गार कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनीही आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, आमदार अॅड. अनिल परब, आमदार बाळा नर, विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत उपस्थित होते.