अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीरच सचिन कोते, जगदीश चौधरी जिल्हाप्रमुखपदी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. रावसाहेब खेवरे यांची शिर्डी लोकसभा जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सचिन कोते (विधानसभा-शिर्डी, कोपरगाव, संगमनेर) आणि जगदीश चौधरी (विधानसभा-अकोले, श्रीरामपूर, नेवासा) यांच्याकडे देण्यात आली आहे. मुपुंद सिनगर पाटील यांची शिर्डी लोकसभा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.