
दहशतवाद्यांविरुद्ध मोहिमेदरम्यान बेपत्ता झालेल्या दोन कमांडोंपैकी एक कमांडो शहीद झाला असून त्याचा मृतदेह गुरुवारी कोकेरनाग क्षेत्रातील गडुलच्या जंगलात आढळून आला होता. तर दुसऱया कमांडोचा अद्याप शोध लागलेला नाही.
अनंतनाग जिह्यातून मंगळवारपासून हे दोन्ही कमांडो बेपत्ता झाले होते. एलिट 5 पॅरा फोर्सचा ते भाग आहेत. घनदाट जंगल, डोंगराळ भाग आणि हवामान अत्यंत खराब असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत. दहशतवाद्यांविरुद्ध शोधमोहीम राबवली जात असताना या दोघांचा संपर्क तुटला होता, असे अधिकाऱयांनी सांगितले. शोधकार्यासाठी हवाई दलाचीही मदत घेतली जात आहे.