टपाल कर्मचाऱ्यांसाठी नेत्रचिकित्सा शिबीर

लायन क्लब ऑफ मिडटाऊनच्या वतीने जागतिक टपाल दिन आणि जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्ताने दादर येथील मुख्य टपाल कार्यालयात पोस्टमन व इतर टपाल कर्मचाऱयांसाठी नेत्रचिकित्सा शिबीर आयोजित केले होते. लायन इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3232 ए1 लायन सेवा सप्ताह साजरा करताना अर्पण सेवा महोत्सवांतर्गत हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फिरोज कात्रक, शिराज कात्रक, एलसी मिडटाऊनचे चेअरमन डॉ.जगन्नाथ हेगडे, सुरेखा हेगडे, आदिल भेसाडिया, विजय रायमाने, मोहन वायदंडे, विजय परदेशी, जितेंद्र सकपाळ, उमेश कोंडवस्कर, संजू सासमल, ज्योती भोसले, दिलीप वरेकर, नंदकुमार बागवे उपस्थित होते.