
हिंदुस्थानची अनुभवी स्क्कॅशपटू जोशना चिनप्पाने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत सोमवारी योकोहामा येथे झालेल्या जपान ओपन स्क्वॅश स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इजिप्तच्या हया अलीचा पराभव करून आपल्या कारकिर्दीतील 11वा पीएसए टूर किताब जिंकला.
जोशना चिनप्पाने या चॅलेंजर स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिसऱया मानांकित अलीकर 38 मिनिटांत 11-5, 11-9, 6-11, 11-8 अशी मात केली. उपांत्य लढतीत 117व्या मानांकित चिनप्पाने चौथ्या मानांकित इजिप्तच्या राणा इस्माईलला 11-7, 11-1, 11-5 असे सरळ गेममध्ये पराभूत करून अंतिम फेरी गाठली.
दरम्यान, विद्यमान पुरुष राष्ट्रीय किजेता आणि जगातील 29का क्रमांक असलेला अभय सिंह अमेरिकेतील रेडकुड सिटी येथे सुरू असलेल्या पीएसए गोल्ड स्पर्धा ‘सिलिकॉन व्हॅली ओपन’च्या प्री-क्कार्टर फायनलमध्ये पराभूत झाला. त्याला जगातील नवव्या क्रमांकाचा आणि पाचव्या मानांकित प्रान्सचा व्हिक्टर क्रूइनने 4-11, 2-11, 1-11 असे पराभूत केले.