…. ते पाहून माझी मान शरमेने खाली गेली, जावेद अख्तर यांनी मोदी सरकारला फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी हे हिंदुस्थान दौऱ्यावर आले होते. त्यांनी हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. त्यांचं ज्या प्रकारे हिंदुस्थानात स्वागत झाले त्यावरून अनेकांनी मोदी सरकारवर टीका केली. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देखील यावरून मोदी सरकारला फटकारले आहे.

” जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना असलेल्या तालिनाच्या प्रतिनिधिचे आपल्या देशात झालेले आदरातिथ्य पाहून माझी मान शरमेने खाली गेली. जे लोक प्रत्येक प्रकारच्या दहशतवादा विरोधात उभे राहतात, तेच आज या दहशतवादी संघटनेच्या प्रतिनिधीचा सन्मान करत असल्याचं दिसत आहे. हे अतिशय दु:खद आहे.”, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला.

मुत्तानी हे हिंदुस्थान दौऱ्यावर असताना त्यांनी उत्तर प्रदेशमधील दारुल उलूम देवबंद या संस्थेला देखील भेट दिली होती. त्यावरूनही जावेद अख्तर यांनी या संस्थेला खडे बोल सुनावले आहेत. ”देवबंदला देखील लाज वाटली पाहिजे की त्यांना तालिबानच्या प्रतिनिधीचं स्वागत ‘इस्लामिक हिरो’ सांगत केलं. ही तिच व्यक्ती आहे जिने मुलींच्या शिक्षणावर पूर्णपणे बंदी आणलीय. देशातील माझ्या बंधू आणि भगिनींनो आपल्याला झालंय तरी काय? असा सवाल जावेद अख्तर यांनी केला.