पाऊस पाठ सोडेना, मुंबईत जोरधार

दसऱ्यानंतर दिवाळीतही बरसणारा पाऊस मुंबईची पाठ सोडतच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आज दिवसभराच्या मोकळिकीनंतर सायंकाळी पावसाने मुंबईत पुन्हा विजांचा लखलखाट आणि विजांच्या कडकडाटासह बरसण्यास सुरुवात केली. यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीलाही फटका बसला.