अनंत सिंह स्टेजवर पोहोचताच स्टेज कोसळला आणि पुढे जे घडले ते भयंकर

सध्या बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्ष प्रचारात रंगले आहेत.  अशातच मोकामा विधानसभा मतदारसंघातून अनंत सिंह ही जोरदार प्रचार करत आहेत. शनिवारी ते मोकामाच्या पूर्व परिसरात  जाहीर सभा घेण्यासाठी पोहोचले होते. मात्र स्टेजवर पोहोचताच स्टेज खाली कोसळला आणि ते खाली पडले. मात्र सुदैवाने ते बचावले.

अनंत सिंह हे प्रसिद्ध मोकामा विधानसभा मतदारसंघातून जेडीयूकडून निवडणूक लढवत आहेत. अनंत सिंह मोकामा येथे आले असता समर्थकांनी त्यांना स्टेजवरून जनतेला संबोधित करण्याची विनंती केली. त्यावेळी ते अनंत सिंग स्टेजवर चढले आणि ते खाली कोसळले. संरक्षणासाठी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ वाचवले. त्यानंतर त्यांना ताबडतोब त्यांच्या गाडीत बसवून दुसऱ्या ठिकाणी नेले. अनंत सिंग यांचा स्टेज कोसळल्याचा व्हि़डीओही समोर आला आहे, ज्यामध्ये समर्थक अनंत सिंह जिंदाबाद जिंदाबाद अशा घोषणा देत होते.

एका समर्थकाने मायक्रोफोन घेतला आणि भाषण द्यायला सुरुवात केली, आणि अनंत सिंग झिंदाबादच्या घोषणा देच असताना स्टेज कोसळला आणि ते खाली कोसळले. स्टेज कोसळताच समर्थकांमध्ये घबराट पसरली