
पाकिस्तानकडून यापुढे आमच्यावर हल्ला झाला किंवा आमच्या भूमीवर बॉम्बफेक झाल्यास आम्ही थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर हल्ला चढवू, असा इशारा अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने दिला आहे.
दहशतवाद्याच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान व अफगाण सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. त्यात दोन्हीकडचे मोठे नुकसान झाले आहे. तुर्कीच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांत शांतता चर्चा सुरू आहे. मात्र ही चर्चा सुरू असतानाच अफगाणिस्तानने धमकी दिली आहे. त्यामुळे चर्चा फिसकटण्याची शक्यता आहे.




























































