
प्रसिद्ध चित्रकार रमेश नायर यांच्या चित्रे आणि रेखाटनांच्या एकल प्रदर्शनाचे आयोजन फोर्ट येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 11 ते 17 नोव्हेंबरदरम्यान करण्यात आले आहे. ‘रिकन्स्ट्रक्टिंग फ्रॅग्मेंट्स ः स्मृती, कल्पना आणि अवकाशाचा प्रवास’ असे हे प्रदर्शन असेल. हे प्रदर्शन दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले राहील. प्रदर्शनाचे उद्घाटन 11 नोव्हेंबर रोजी सायं. 5.30 वाजता प्रख्यात कलाकार व अकॅडेमिशियन डॉ. डग्लस एम. जॉन आणि सुप्रसिद्ध कलाकार व लेखक प्रकाश बाल जोशी यांच्या हस्ते होणार आहे. केरळमधील थलसेरी येथे जन्मलेले रमेश नायर यांनी हिंदुस्थानसह बँकॉक आणि दुबई येथे अनेक एकल आणि समूह प्रदर्शनांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.





























































