
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर वर्तवली आहे. दरम्यान, स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी घटनेचा आढावा घेतला.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, i-20 कारच्या मागच्या भागात हा स्फोट झाला. स्फोटावेळी कारमध्ये तीन जण होते. या कारचा नंबर आणि मालकाचे नाव याबाबत पोलीस तपास करत आहेत. या स्फोटाप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.




























































