Video दिल्ली बॉम्बस्फोटाचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, भर ट्राफिकमध्ये…

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली आय-20 कार पुलवामाचा रहिवासी असलेल्या उमर उन नबी या डॉक्टरची असून त्यानेच स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. पोलिसांनी उमरचा डॉक्टर मित्र सज्जाद अहमद मल्ला व त्याच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान दिल्ली बॉम्बस्फोटात वापरलेल्या कारचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून यात सदर कार ही धिम्या वेगाने जात असताना त्यात स्फोट झाल्याचे दिसत आहे. पीटीआयने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

भीतीने गांगरून जाऊन घडवला स्फोट

हा स्फोट नेहमीसारखा नव्हता. हल्लेखोरांचा प्लॅन काही वेगळाच होता. त्यांनी कार गर्दीत घुसवली नाही किंवा जास्तीत जास्त जीवितहानी व्हावी असा त्यांचा हेतू दिसत नव्हता. कारमधून स्फोटके घेऊन ते दुसऱ्या ठिकाणी जात असावेत. मात्र पकडले जाण्याच्या भीतीने गांगरून जाऊन, घाईगडबडीने त्यांनी स्फोट घडवून आणला, असे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले आहे.

झाडावर लटकलेला आढळला मृतदेह

स्फोटामुळे अनेक मीटरवरच्या इमारती हादरल्या. स्फोटात मरण पावलेल्या व्यक्तींच्या शरीराचे तुकडे झाले होते. एका व्यक्तीचा मृतदेह झाडावर लटकलेला पोलिसांना आढळला. घटनास्थळी तपास करताना आज सकाळी हा मृतदेह आढळला, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.