अमेरिकेत या, आम्हाला प्रशिक्षण देऊन परत जा! अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांचे वक्तव्य चर्चेत

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एच-1बी व्हिसा धोरण म्हणजे ज्ञान हस्तांतरण असून परदेशी नागरिकांनी अमेरिकेत यावे, अमेरिकन लोकांना प्रशिक्षण द्यावे आणि आपल्या देशात परत जावे, असे वक्तव्य अमेरिकेचे अर्थमंत्री स्काॅट बेसेंट यांनी केले. वापरा आणि हाकला, अशी भूमिका मांडल्यामुळे त्यांच्या व्यक्तव्यावरून चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेत प्रतिभाशाली कर्मचाऱयांची कमतरता असून परदेशातून टॅलेंट आणावे लागेल, असे ट्रम्प हे फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलले होते. मात्र, अमेरिकेचे अर्थमंत्री स्काॅट बेसेंट यांनी ही भूमिका अधिक विस्ताराने मांडली. ते म्हणाले की, परदेशातून पुशल कर्मचाऱ्यांनी अमेरिकेत यावे, अमेरिकन लोकांना तीन, पाच किंवा सात वर्षे प्रशिक्षण द्यावे आणि पुन्हा स्वतःच्या देशात निघून जावे. जेणेकरून अमेरिकन कर्मचारी पूर्णपणे प्रशिक्षित होऊन त्या ठिकाणी काम करतील, असा राष्ट्राध्यक्षांचा दृष्टिकोन आहे.