
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई आणि ठाणे शहरात शिवसैनिकांनी ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे, वैद्यकीय साहित्य वाटप, आरोग्य शिबीरे आदी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यात आली.
कांजुरमार्ग येथे स्वच्छता मोहीम
शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कांजुरमार्ग येथील शिवसेना शाखा क्रमांक 117 च्या वतीने विभागामध्ये स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यावेळी शाखाप्रमुख रविंद्र महाडिक, अनंत पाताडे, श्वेता पावसकर, योगेश पेडणेकर, लीना मांडलेकर, भास्कर परब, सुवर्णा पोवार, वनिता शिंदे, अनिकेत मोरे, विलास मोरे, अंजली परब, मिलिंद खानविलकर, दीपक खेडेकर, संजीव पेडणेकर, हरी जाधव, प्रतीक पावसकर, महेश कदम, बाळा पाटील, सचिन भोसले, संदीप मोरे, सुभाष राऊळ, जयेश सावंत आदी उपस्थित होते.





























































