
राज्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धारावीतील चर्मकार समाजाच्या भक्कम एकजुटीचे दर्शन निर्धार मेळाव्यात दिसले. यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार बाबुराव माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय चर्मकार संघाचा मेळावा प्रिन्सिपल मनोहर जोशी कॉलेजच्या आवारात संपन्न झाला, यावेळी बोलताना बाबूराव माने म्हणाले. मुंबई पालिकेच्या आगामी निवडणुकीत चर्मकार समाजाची ताकद सर्व 227 वार्डमधून दिसली पाहिजे. प्रत्येक वॉर्डमध्ये पाच हजार मतदार हे आपले चर्मकार, मागासवर्गीय समाजाचे आहेत. यासाठी आपल्या वॉर्डमधील लोकांच्या संपर्कात आपण असले पाहिजे. कोण कुठे राहतो, त्यांची नावे, पत्त्यासहित वॉर्ड अध्यक्षाला माहिती पाहिजे. यासाठी 227 वॉर्डमध्ये राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वॉर्ड अध्यक्षांची नियुक्ती झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई अध्यक्ष विलासराव गोरेगांवकर, माजी प्रदेशाध्यक्ष राम कदम, अॅड. कैलास आगवणे, अशोक देहरे, गणेश खिलारे, मिलिंद आगवणे, मनोहर शिंदे, अशोक देहरे, विजय खरात, मिलिंद खैरे, दीपक भोसले, विलास गोरेगांवकर,
अॅड. कैलास आगवणे आदी उपस्थित होते.





























































