
लग्न म्हणजे आनंद, आठवणी आणि भावभावनांचा सुरेख संगम. त्यातही मुलीचे लग्न म्हणजे वडिलांसाठी खूप खास आणि भावनिक क्षण. एका पित्याने लेकीच्या लग्नात जबरदस्त डान्स केला. अगदी स्टेजवरून खाली उतरत अशा काही डान्स स्टेप्स केल्या की सगळे पाहुणे थक्क झाले. गाणं सुरू होताच त्यांनी एकदम प्रोफेशनल डान्सरप्रमाणे स्लो-मोशन, लॉकिंग, पॉपिंग आणि मॉडर्न स्टाईलचा सुंदर मिलाफ असलेल्या स्टेप्स दणक्यात सादर केल्या. स्टेजच्या बाजूला उभी असलेली मुलगी आनंदाने ओरडत होती. तिच्या डोळ्यात अभिमान आणि चेहऱयावर काwतुकाचे हास्य होते. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.



























































