
कॉँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधातील मनी लाँडरिंग प्रकरणात ‘ईडी’ने दिल्लीच्या राउज अव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. ब्रिटनचे शस्त्रास्त्र व्यावसायिक संजय भंडारी यांच्यासोबत झालेल्या व्यवहाराशी संबंधित हे प्रकरण आहे. या प्रकरणात जुलै महिन्यात वाड्रा यांचा जबाब नोंदवून घेतला होता. वाड्रा आणि भंडारी यांच्यात आर्थिक व्यवहाराचे पुरावे ईडीला आढळले होते. या प्रकरणाची सुनावणी 6 डिसेंबर रोजी होणार आहे.






























































