असं झालं तर… ड्रायव्हिंग लायसन्स हरविले तर…

Lost Your Driving License Here is the Step-by-Step Guide to Get a Duplicate DL Copy

1 वाहने चालविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक असते. ड्रायव्हिंग लायसन्स हरविले तर मोठी अडचण होऊ शकते. डुप्लिकेट प्रत काढली नाही तर मोठा दंड भरावा लागू शकतो.

2 लायसन्सची डुप्लिकेट प्रत काढण्यासाठी सर्वप्रथम जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. या तक्रारीच्या आधारे डुप्लिकेट परवाना काढता येतो.

3 लायसन्स ज्या आरटीओमधून काढले होते तेथे डुप्लिकेट लायसन्ससाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीची प्रत जोडणे आवश्यक असते.

4 अर्जासोबत आधार किंवा पॅन कार्ड, रहिवासाचा पुरावा म्हणून वीज बिल, रेशनकार्ड, पासपोर्ट, आधीच्या लायसन्सचा तपशील इत्यादी माहिती भरून संबंधित कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.

5 अर्ज भरल्यानंतर आवश्यक शुल्क भरावे. त्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी केली जाते. आरटीओ कार्यालयात ठराविक वेळी जावे. तेथे तुमचा फोटो काढण्यात येतो.