इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, इंडिगोने UAE जाणाऱ्या विमानाचा बदलला मार्ग

इथिओपियामध्ये १०,००० वर्षांनंतर ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला आहे. यामुळे युएईला कण्र्या इंडिगो विमानाचे मार्ग बदलावे लागले. स्थानिक वृत्तानुसार, ज्वालामुखीचा उद्रेक आता थांबला आहे, परंतु त्यातून बाहेर पडणारा प्रचंड राखेचा थर वातावरणात १५ किलोमीटर उंचीवर पोहोचला आहे आणि तो लाल समुद्रातून येमेन आणि ओमानकडे पसरत आहे.

खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, इथिओपियाच्या अफार प्रदेशातील निष्क्रिय ज्वालामुखी हेले गुब्बीचा इतिहासात पहिल्यांदाच इतक्या स्फोटक वेगाने उद्रेक झाला आहे. या उद्रेकाचा सर्वात मोठा परिणाम विमान वाहतुकीवर झाला आहे. युएईकडे (अबू धाबी) जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट ६ई १४३३ चा (कन्नूर ते अबू धाबी) मार्ग सोमवारी बदलावा लागला. राखेमुळे विमानाचे इंजिन धोक्यात येऊ शकते, म्हणून ते अहमदाबाद विमानतळावर वळवण्यात आले. इतर काही विमानांना देखील मार्ग बदलावा लागला असून याचा प्रादेशिक हवाई वाहतुकीवर परिणाम होत आहे.