
हिवाळ्याच्या दिवसात खजूर हे एक सुपरफूड मानले जाते. खजूरात कॅलरीज, नैसर्गिक साखर, फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि जीवनसत्त्वे असतात, तसेच B6 सारखे आवश्यक पोषक घटक असतात.
बीटाच्या रसामध्ये आले घालून पिण्याचे हे आरोग्यवर्धक फायदे तुम्हाला माहीत आहेत का, वाचा
खजूर खाण्यामुळे आपल्या शरीराला असंख्य फायदे मिळतात. थंड हवामानामुळे ऊर्जेची पातळी खालावते. अशावेळी खजूर हा एक उत्तम पर्याय मानला जातो. खजूर खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते आणि शरीर उबदार राहते. खजूरमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज सारख्या नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, यामुळे शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते. म्हणूनच हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी खजूर खाण्याची शिफारस केली जाते.
एका दिवसात किती खजूर खावेत?
मधुमेह किंवा लठ्ठपणा नसेल तर एक निरोगी व्यक्ती २ ते ३ खजूर खाऊ शकते. मधुमेह असलेल्या व्यक्तीने खजूर खाण्यापूर्वी त्यांची साखरेची पातळी तपासली पाहिजे. त्यांच्यासाठी एक खजूर खाणे पुरेसे आहे. तरीही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
खजूर दुधात घालून किंवा थेट खाणे कसे फायदेशीर आहे?
खजूर खाण्याची योग्य पद्धत जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. कोणत्याही स्वरूपात खजूर खाऊ शकता. सुकामेव्यांसोबत खजूर खाल्ल्याने अतिरिक्त पोषण मिळते. त्याचप्रमाणे, दुधासोबत खजूर खाल्ल्याने कॅल्शियमचे प्रमाण चांगले मिळते. म्हणून, तुम्ही गरजेनुसार त्यांचे सेवन करू शकता. हे दोन्ही प्रकारे फायदेशीर ठरेल.
रिकाम्या पोटी किंवा जेवल्यानंतर खजूर कसे खावे?
तज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी खजूर खाणे सर्वात फायदेशीर आहे. सकाळी कोणत्याही सुक्या मेव्यासोबत खजूर खाल्ल्याने दिवसभर उर्जेची पातळी राखण्यास मदत होते, पचन सुधारते आणि पोटाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. म्हणून सेवन कमी प्रमाणात करणे हितावह आहे.

























































