
ऑनलाइन व्हिडीओ मीटिंगसाठी लोकप्रिय असलेला गुगलचा प्लॅटफॉर्म ‘गुगल मीट’ आज ठप्प झाला. अनेक युजर्सला गुगल मीटवर जाऊन मीटिंगमध्ये सहभागी होण्यात अडचणी आल्या. अनेकांनी ‘एक्स’ आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दलची नाराजी व्यक्त केली. दुपारी 12.20 मिनिटांपर्यंत तब्बल 1,455 युजर्सनी गुगल मीट ठप्प झाल्याची तक्रार ‘डाऊनडिटेक्टर’ या संकेतस्थळाने दिली.
याआधी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतही गुगल मीट वापरण्यात अडचणी आल्या होत्या. 15 हजारांहून अधिक युजर्सनी तक्रारी केल्या होत्या. ‘डाऊनडिटेक्टर’ संकेतस्थळावरील माहितीनुसार, 79 टक्के तक्रारी या व्हिडीओ का@न्फरन्सिंगशी निगडित होत्या. 16 टक्के तक्रारी या सर्व्हर कनेक्शनशी संबंधित होत्या, तर 5 टक्के तक्रारी या मोबाईल अॅपशी संबंधित होत्या. मागच्याच आठवडय़ात क्लाऊडफ्लेअर संकेतस्थळ ठप्प झाले होते. याचा फटका ‘एक्स’, ‘पॅनव्हा’ आणि ‘चॅटजीपीटी’ यांच्यासारख्या संकेतस्थळानांही बसला होता.

























































