
‘आदर्श’ घोटाळा करून भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये पवित्र झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे ‘भाकरी खातात का नोटा’ असे हिणवत मिंध्यांनी भाजपला डिवचले. भोकरमध्ये मिंधे गटाच्या प्रचारासाठी आलेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठवली. केवळ रस्ते बांधले म्हणजे विकास केला अशी अशोक चव्हाणांची समजूत आहे. परंतु या भागातील तरुण रोजगारासाठी वणवण करीत आहेत हे कधी त्यांना दिसले नाही. एखादा उद्योग सुरू करून बेरोजगारांना काम द्यावे असेही चव्हाणांना कधी वाटले नाही. फक्त प्रत्येक एजन्सी आपल्यालाच कशी मिळेल, हाच याचा विकास असा टोलाही त्यांनी लगावला.
























































