
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचत आहे, तसतसा बीडमध्ये राजकीय गुन्हेगारीला उैत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आष्टी येथील कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात खाडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या पुण्यात उपचार सुरू आहेत. खाडे यांच्यावरील हल्ल्याने बीडमधील राजकीय गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे.




























































