स्वयंपाकघरातील टाईल्स खराब झाल्या

स्वयंपाकघरात तेल, मसाले, वाफ यामुळे टाईल्सवर पिवळेपणा येतो आणि चिकट तेलाचा थर जमा होतो. टाईल्स चकाचक करण्यासाठी बेकिंग सोडा आणि पांढऱया व्हिनेगरचे मिश्रण. याची पेस्ट तयार करून टाईल्सवर लावा आणि स्क्रबरने पुसून घ्या.

आणखी एक उपाय म्हणजे लिंबू आणि मीठ. कापलेल्या लिंबावर मीठ टाका. त्या लिंबाने टाइल्स घासून घ्या. यामुळे घाण आणि पिवळेपणा निघून जातो. तेलाच्या थरामुळे टाईल्सवर आलेला चिकटपणा काढण्यासाठी डिशवॉश लिक्विड आणि कोमट पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये मिसळून घ्या. ते पाणी टाईल्सवर स्प्रे करा.