
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु झाले असून लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी राजस्थानच्या बिकानेर येथील 14 व्या लोकसभेचे सदस्य आणि दिवंगत अभिनेत धर्मेंद्र यांच्या उल्लेखनीय कार्याचा उल्लेख करत श्रद्धांजली वाहिली.
























































