काठी टेकत टेकत…व्हिलचेअर वरून आजी-आजोबांचे मतदान, तरूणांना लाजवणारा उत्साह 

आज नगरपरिषद निवडणुकीत मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळाला.काठी टेकत, कुणाचा तरी आधार घेत, काहींनी व्हिलचेअर वरून येत मतदानाचा हक्क बजावला.
राजापूर शहरातील 95 वर्ष वय असलेल्या शैला प्रभाकर मालपेकर आजींनी मतदानाचा हक्क बजावला.रत्नागिरी शहरातील 86 वर्षांच्या शशिकांत लिमये यांनाही काठी टेकत मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला. 83 वर्षाच्या माधुरी कुलकर्णी यांनी मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी सकाळपासूनच मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळाला.सकाळी पहिल्या टप्प्यात 14.28 टक्के मतदान झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात 58.31 टक्के मतदान झाले होते.