
२०२५ हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही दिवस राहिले आहेत. त्याआधीच गुगल इंडियाने २०२५ च्या ‘इयर इन सर्च’चे निकाल जाहीर केले आहेत. या वर्षी हिंदुस्थानात गुगलवर काय सर्वाधिक काय शोधले गेले याची माहिती देण्यात आली आहे. गुगलच्या अहवालात असे दिसून आले आहे की, लोकांनी क्रीडा, तंत्रज्ञान, मनोरंजन, राष्ट्रीय घडामोडी या संदर्भातील घडामोडी शोधण्यात सर्वात जास्त रस घेतला. २०२५ मध्ये आयपीएल आणि महिला क्रिकेट सारख्या क्रीडा स्पर्धांसंदर्भातही विविध मुद्द्यांवर सर्च करण्यात आले आहेत.
गुगलने २०२५ मधील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विषयांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात महाकुंभमेळ्यानंतर धर्मेंद्र हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. २०२५ मध्ये महाकुंभमेळा हा सर्वात जास्त शोधला जाणारा विषय होता. त्यानंतर धर्मेंद्र दुसऱ्या क्रमांकावर होते. तिसऱ्या क्रमांकावर बिहार निवडणूक निकालाबद्दल सर्वाधिक सर्च करण्यात आले होते. तर चौथ्या क्रमांकावर हिंदुस्थान आणि पाकिस्तान संदर्भातील बातम्या या सर्वाधिक वाचण्यात आल्या. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर दिल्ली निवडणूक निकाला संदर्भातील बातम्या या बातम्या शोधल्या गेल्या.
धर्मेंद्र यांच्याबद्दल सर्वाधिक शोधल्या गेलेल्या प्रश्नांमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर धर्मेंद्र जिवंत आहेत की नाही, या प्रश्नाचे उत्तर सर्वाधिक शोधण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या आरोग्यासंदर्भातील अपडेट जाणून घेण्यासाठीही सर्च करण्यात आले होते. असे विविध प्रश्न धर्मेंद्र यांच्याशी निगडीत गुगलवर शोधण्यात आले होते.




























































