
‘नवोदित मुंबई श्री’च्या निमित्ताने शास्त्राrनगर मैदान शरीरसौष्ठवपटू आणि क्रीडाप्रेमींच्या गर्दीने अक्षरशा ओसंडून वाहात होतं. स्पर्धा नवोदितांची असली तरी स्पर्धेला लाभलेला अभूतपूर्व आणि विक्रमी प्रतिसाद बृहनमुंबई शरीरसौष्ठव संघटनेची वाढलेली खरी ताकद दाखवून गेला. अत्यंत चुरशीच्या लढतीत ‘नवोदित मुंबई श्री’चा मान विराज फिटनेसच्या साजिद मलिकने मिळवला. 235 खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक वजनी गटात इतकी चुरस होती की, अव्वल पाच खेळाडू निवडताना जजेसना तीनदा पंपेरिजन करावी लागली. स्पर्धेचे पुरस्कार वितरण आयोजक अजय विचारे, शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, विशाल परब, सुनील शेगडे, राजेश निकम यांच्या उपस्थितीत पार पडला.
‘नवोदित मुंबई श्री’ 2025 चे गटवार विजेते
55 किलो – 1. रमण राठोड (बोवलेकर जिम),
60 किलो – 1. धर्मराज जमादार (एम जे 52 फिटनेस), 65 किलो 1. प्रतीक महाजन (विराज फिटनेस),
70 किलो – 1. साजिद मलिक (विराज फिटनेस)
75 किलो – 1.हरीश साळुंखे (परब फिटनेस),
80 किलो – 1. फ्रान्सिको फर्नांडिस (सावरकर जिम). 80 किलोवरील 1. तुषार वाघ (एज फिटनेस),
नवोदित मुंबई श्री ः साजिद मलिक (विराज फिटनेस)
आसिफपुढे मुंबई कोसळली, विजयी चौकारानंतर मुंबईचा पराभव
केएम आसिफच्या घातक गोलंदाजीमुळे केरळने सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतील ग्रुप ‘अ’ सामन्यात विद्यमान विजेत्या मुंबईवर 15 धावांनी विजय मिळवून स्पर्धेत प्रचंड खळबळ माजवली. 179 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्टार खेळाडूंनी सजलेल्या मुंबईचा डाव 19.4 षटकांत 163 धावांवर गुंडाळला गेला. हा मुंबईचा पाच सामन्यांतील पहिलाच पराभव असला तरी संघ 16 गुणांसह अव्वल आहे. केरळने तिसऱया विजयासह 12 गुण मिळवत तिसऱया स्थानावर झेप घेतली,
प्रथम फलंदाजी करत केरळने 5 बाद 178 धावा केल्या होत्या. संजू सॅमसनने 28 चेंडूंत 46 धावा ठोकत झंझावाती सुरुवात दिली. रोहन कुणुम्मल (2) लवकर बाद झाला, पण सॅमसनच्या जोरावर केरळ 7 षटकांत 2 बाद 58 वर पोहोचला. सॅमसन बाद झाल्यानंतर धावगती मंदावली, तरी विष्णू विनोद (43) आणि मोहम्मद अजहरुद्दीन (32) यांनी 63 धावांची भागीदारी करत डावाला स्थैर्य दिले. 179 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा आयुष म्हात्रे (3) लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर अजिंक्य रहाणे (32) व सरफराज खान (52) यांनी 80 धावांची भागीदारी करीत डाव स्थिरावला. 12 षटकांत मुंबई 3 बाद 99 वर होती आणि सामना झोळीत येईल असे वाटत होते. 18 चेंडूंत अवघ्या 31 धावांची गरज असताना 18व्या षटकाने मुंबईचा घात केला. अवघ्या चार चेंडूंत आसिफने जणू विजेचा झटका दिल्याप्रमाणे साईराज पाटील (13), सूर्यकुमार यादव (32) आणि शार्दूल ठाकूर (0) यांना बाद करत सामन्याचे पारडे केरळकडे झुकवले. मग त्याने शेवटच्या षटकात शम्स मुलानी व हार्दिक तामोरेला बाद करत मुंबईचा डाव संपवला.

























































