
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हिंदुस्थान दौऱ्यावर आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच हिंदुस्थान दौरा आहे. या दौऱ्यात पुतिन सुमारे 30 तास हिंदुस्थानात होते. यामुळे व्लादिमीर पुतिन यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदी यांनी एका खासगी मेजवानीचं आयोजन केले. या मेजवानीचे मेन्यू कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राष्ट्रपती भवनात शुक्रवारी पुतिन त्यांच्या सन्मानार्थ खास ‘स्टेट डिनर’चे आयोजन केले होते. या भोजनात पुतीन यांना हिंदुस्थानी पदार्थांची ओळख करून देणारी शुद्ध शाकाहारी थाळी सादर करण्यात आली. दक्षिणेकडील ‘मुरुंगेलै चारू’ (रसम) या सूपने भोजनाची सुरुवात झाली, त्यानंतर काश्मीरचे ‘गुच्ची दून चेतीन’ (stuffed morels with Kashmiri walnut chutney) आणि पूर्व हिमालयातील ‘व्हेज झोल मोमो’ यासारख्या विविध भागातील पदार्थांचाही समावेश मेजवानीत होता.
पुतिन यांच्यासाठी आयोजित केलेल्या भोजनात अनेक पदार्थांचा समावेश होता. यामधील मुख्य पदार्थांमध्ये जाफरानी पनीर रो , पालाक मेथी मटार का साग, तंदूरी आलू आणि अचारी बैंगन यांचा समावेश होता. दाल तडका आणि ड्राय फ्रूट्स व केशर घातलेला पुलाव यासोबत लच्छा परांठा, मगज नान आणि विविध प्रकारच्या भाकऱ्यांचा पुतीन यांनी आस्वाद घेतला. गोड पदार्थांमध्ये बादामाचा हलवा , केसर-पिस्ता कुल्फी , आणि पारंपारिक मुरक्कू यांचा आस्वाद घेता आला. ज्यामुळे पुतिन यांना संपूर्ण हिंदुस्थानच्या पाककलेची विविधता एकाच थाळीत अनुभवता आली.
भोजनासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाचीही खास व्यवस्था करण्यात आली होती. राष्ट्रपती भवन नेव्हल बँडने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि रशियन संगीताचे मिश्रण सादर केले. ‘तसेच लोकप्रिय हिंदी चित्रपट धून ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ चे सादरीकरण झाले. या सांस्कृतिक मेजवानीतून हिंदुस्थान आणि रशियामधील सांस्कृतिक संबंध आधोरेखित झाले. भोजनानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी पुतीन यांना विमानतळावर निरोप दिला.
व्लादिमीर पुतिन यांचं हिंदुस्थानात आगमन, पंतप्रधान मोदींनी विमानतळावर केलं स्वागत

























































